ड्युटीच्या वेळेत रोझा ठेवता येणार नाही, वैमानिकांसह फ्लाईट अटेंडेण्ट्सना दिल्या सूचना

पाकिस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी पीआयएने मोठा निर्णय घेतला आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात उड्डाणादरम्यान ड्युटीवर असलेल्या वैमानिकाला आणि फ्लाईट अटेंडेण्ट्सच्या रोझा ठेवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या विमान कंपनीने वैद्यकीय सल्ल्यानुसार हा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की उपवासामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये डिहायड्रेशन होऊ शकते. तसेच त्याला आळस आणि झोप यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

कॉर्पोरेट सेफ्टी मॅनेजमेण्ट आणि एअर क्रू मेडीकल सेंटर या दोघांच्या सल्ल्याने पाकिस्तान इंटरनॅशनलचा वैमानिक आणि केबिन क्रू सदस्य़ांनी उड्डाणादरम्यान रोझा ठेवू नये. पीआयएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या सल्ल्यांवर आधारित, पीआयएच्या उच्च व्यवस्थापनाने वैमानिक आणि केबिन क्रू कर्मचाऱ्यांना तत्काळ याचे पालन करण्याचे आदेश जारी केले आहेत. असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीने उपवास केला तर त्याला झोप आणि आळस यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे वैमानिकासह क्रू मेंबर्सना आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत उड्डाणांसाठी ड्युटीवर असताना उपवास न ठेवण्यास सांगण्यात आले आहे. राष्ट्रीय विमान कंपनीच्या एअरबस ए 320 विमान मे 2020 मलीरमध्ये मॉडेल कॉलनीजवळ जिन्ना गार्डेन परिसरात अपघातग्रस्त झाले होते. त्यावेळी त्या विमानात 91 प्रवासी आणि चालक दलाचे 8 सदस्य होते. त्यावेळी विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर काही मिनीटांनी अपघातग्रस्त झाले होते. या अपघातात केवळ 2 प्रवासी वाचले होते. याच प्रकरणाची चौकशी गेल्या महिन्यात सुरु होती. ज्यामध्ये या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला होता.

जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार अपघातग्रस्त विमान ए 320 एअरबसमध्ये 99 लोकं प्रवास करत होते. यापैकी 97 लोकांचा मृत्यू झाला आणि त्यापैकी केवळ 2 लोकं वाचली. धावपट्टीपासून फक्त 15 समुद्री मैल बाकी असताना पहाटे 2.30 वाजता हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने वैमानिकाला पहिला इशारा दिला होता. वैमानिकाने विमान 7000 फूट ते 10000 फूट उंचीवर न्यावे, असे सांगण्यात आले. पण विमानाच्या या उंचीवर समाधानी असून विमान सुरक्षितपणे उतरवणार असल्याचं वैमानिकाकडून उत्तर आले. यानंतर विमानाचे अंतर धावपट्टीपासून फक्त 10 मैलांवर असताना एटीसीने दुसरा इशारा दिला, त्यावेळी विमान 7 हजार फूट उंचीवरून 3 हजार फूट खाली आले होते. यावेळीही वैमानिकाला विमान अधिक उंचीवर नेण्यास सांगण्यात आले. यावेळी वैमानिकाने विमान सुरक्षितपणे उतरवण्यास सांगितले. या दुर्घटनेतून वाचलेल्या दोघांपैकी एक बँक ऑफ पंजाबचे अध्यक्ष जफर मसूद आणि दुसरे मोहम्मद जुबेर आहेत. अपघाताचे वर्णन करताना झुबेर यांनी सांगितले की, विमान व्यवस्थित उडत होते, पण लँडिंगच्या आधी तीन वेळा हादरे जाणवले.