राजस्थानातील जैसलमेरमध्ये लष्कराचे एअरक्राफ्ट कोसळले; पायलट थोडक्यात बचावला

राजस्थानच्या जैसलमेरमध्ये लष्कराचे एअरक्राफ्ट कोसळले आहे. जैसलमेरच्या जवाहर नगर भागात ही दुर्घटना घडली. या अपघातातून सुदैवाने पायलट बचावला आहे. प्रसंगावधान राखत योग्यवेळी बाहेर पडल्याने पायलटचा जीव वाचला आहे.

अपघात झालेले एअरक्राफ्ट LCA म्हणजे लाइट कॉम्बैट एयरक्राफ्ट तेजस होते. अपघातावेळी हे एअरक्राफ्ट ऑपरेशनल ट्रेनिंगवर होते. घटनेनंतर लष्कराने या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. काही महिन्यांपूर्वीच डिंसेबर 2023 रोजी तेंलगणात हवाई दलाच्या प्रशिक्षणार्थी विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात दोन पायलटचा मृत्यू झाला होता.