आमच्यासारखे आम्हीच! एकच नाव, चेहराही सारखाच आणि …

जगात आपल्यासारखी दिसणारे एकूण 8 लोक असतात असा समज आहे. परंतु आपण कधी त्यांना प्रत्यक्षात पाहिले नसेल. अशी हुबेहुब दिसणारी माणसे जगात आहेत की नाही,याबाबतच्या चर्चा होत असतात. परंतु योगायोगाने हुबेहुब आपल्यासारखाच  दिसणारा माणूस समोर आला तर ? असाच अनुभव एका व्यक्तीला विमानप्रवासादरम्यान आला आहे.

एक व्यक्ती फ्लाईटमधून प्रवास करत असताना त्याला त्याच्यासारखीच दिसणारी एक व्यक्ती भेटली. दोघांचेही नाव, चेहरा, मित्रमंडळी अगदी सारखेच होते. मार्क गार्लंड अशी दोघांचीही नावे आहेत. दोघेही थायलंडमधील बँकॉकला जात होते. यांच्यातील एक 58 वर्षीय मार्क हे बस चालक आहेत. तर त्यांच्यासारखा दिसणारा 62 वर्षीय मार्क हे बांधकाम व्यावसायीक आहेत. दोघांनीही  सुमारे 11 तासांचा विमान प्रवास एकत्र केला.

एकत्र प्रवास करताना त्यांना एकमेकांबद्दल त्यांना अनेक गोष्टी समजल्या. आश्चर्यांची बाब म्हणजे दोघांनाही चार मुले आहेत. तसेच दोघेही दोघेही सिंगल फादर आहेत. दोघांचे मित्र देखील सारखेच आहेत. हा केवळ योगायोग असावा असे दोघांचे म्हणणे आहे. बस चालक मार्क म्हणाले की, हे किती अनोखा योगायोग आहे. आपण दोघेही सारखेच दिसतोय. मला तुला पाहून आरशात स्वत:ला पाहतोय असं वाटलं. असे ते म्हणाले.

बांधकाम व्यावसायीक मार्क म्हणाले की, मला हे कधीच माहीत नव्हते की आपल्या सारखी दिसणारी माणसे देखील या जगात आहेत. आता तुला भेटल्यावर याची प्रचिती मला आली आहे. विशेष म्हणजे हे दोघेही एकाच शहरात राहत असून त्यांच्या घरातील अंतर अर्ध्या तासाचे आहे.