युवासेनेच्या विस्तारक पदी नियुक्त्या जाहीर 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना विस्तारक पदी नियुक्त्या जाहीर केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

विस्तारक पुढीलप्रमाणे विशाल विचारे (उत्तर कोल्हापूर, दक्षिण कोल्हापूर व करवीर विधानसभा), डॉ. सतीश नरसिंग (कोल्हापूर ग्रामीण व बेळगाव), आदित्य गिड्डे (नागपूर लोकसभा), धर्मराज दानवे (परभणी जिल्हा), राहुल ताजनपुरे – शिर्डी लोकसभा (कोपरगाव, नेवासा, श्रीरामपूर), रामदास कांबळे (संभाजीनगर ग्रामीण), विश्वास पाटेकर – वसई, विरार, नालासोपारा (महापालिका क्षेत्र), सुयश घाडी (मीरा-भाईंदर), विशाल सातव (बारामती लोकसभा), प्रतीक रोचकरी (बीड जिल्हा), दिना पाटील (कल्याण लोकसभा), कामेश जाधव (अमरावती जिल्हा), सोनू वाटमारे (वाशीम जिल्हा), संतोष धोत्रे (अकोला जिल्हा), जयेश वाणी (यवतमाळ जिल्हा).