लवादाने चोरमंडळाच्या बाजुने निकाल दिला, पण सर्वोच्च न्यायालयाने आशेची किरणं दाखवली! – संजय राऊत

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाष्य केले. लवादाने चोरमंडळाच्या बाजुने निर्णय दिला असला तरी सर्वोच्च न्यायालयाने आशेची किरणं दाखवली आहेत, असे राऊत म्हणाले.

खासदार संजय राऊत म्हणाले, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मागे उभे आहेत आणि तेच पुन्हा एकदा शिवसेनेला महाराष्ट्राच्या आणि दिल्लीच्या सत्तेपर्यंत घेऊन जातील. आमच्यातून निघून गेलेल्या चोरमंडळाबाबत काल सर्वोच्च न्यायालयाने काही शंका उपस्थित केल्या. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लवादाने आमच्यावर अन्याय करत चोरांना पात्र ठरवले. घटनेच्या 10व्या परिशिष्टानुसार जो पक्षांतरबंदी कायदा आहे त्यनुसार शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवणे अपरिहार्य होते, पण घटनेची पायमल्ली करून राहुल नार्वेकर यांनी त्यांना पात्र ठऱवले. इतकेच नव्हे तर विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर शिवसेनाही त्यांचीच असा निर्णय देऊन स्वत:चे हसे करन घेतले. त्याविरोधात केलेल्या याचिकेवर काल सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी झाली आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने निकालाशी हा निर्णय विसंगत असल्याचे म्हटले.

विधिमंडळातील बहुमतावर कोणताही पक्ष आणि पक्ष संघटन कोणाचे हे ठरत नाही. पक्षातील संघटनेत बहुमत कोणाचे आहे यावरून पक्ष कोणाचा हे ठरते. पण लवादाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या मर्यादा ओलांडून हा निर्णय दिला. कारण त्यांच्यावर दबाव होता. हा लवादच स्वत: 10 पक्षांतर केलेला आहे. ते कधी शिवसेनेत, कधी राष्ट्रवादी तर कधी अन्य पक्षात होते. आता ते भाजपमध्ये जाऊन विधानसभेचे अध्यक्ष झाले. या सगळ्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतल्याचे एकंदरीत निकालपत्रावरून दिसते. लवादाने चोरमंडळाच्या बाजुने निकाल दिला असला तरी सर्वोच्च न्यायालयाने आशेची किरणं दाखवली आहेत. फक्त यासंदर्भात वेळकाढूपणा नको, असेही राऊत म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

चोरमंडळाचे वकील रोज नवीन मुद्दे आणत असून भंपक, खोटेपणा या मुद्द्यात असतो. काल त्यांनी बनवाट कागदपत्रांचा मुद्दा मांडला. शिवसेना ही बनवाट आहे का? बाळासाहेब, त्यांनी स्थापन केलेली शिवसेना बनावट आहे का? असा सवाल करत राऊत म्हणाले की, यांना बाळासाहेबांचे अस्तित्वच मान्य नाही. हाच त्यांचा बनावटपणा असून आम्ही न्यायालयात आणि जनतेच्या न्यायालयात लढू आणि विजयी होऊ.

मिंधे-अजित पवार गटाचे काही उमेदवार कमळ चिन्हावर लढणार, उपमुख्यमंत्र्यांनीच दिली अप्रत्यक्ष कबुली

महाविकास आघाडीच्या जागावाटपावरही राऊत स्पष्ट बोलले. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा घटक असून आम्ही एकत्र बसून चर्चा करतो आणि निर्णय घेतो. दोन दिवसांपूर्वी स्वत: बाळासाहेब आंबेडकर बैठकीस उपस्थित होते. एखाद दुसऱ्या जागेवरून काही चर्चा होतात, पण आम्ही बैठकीतील काही गोष्टी बाहेर न बोलण्याची पथ्य पाळतो. तसेच महाविकास आघाडीत जिथे ज्यांच्याकडे जो ताकदीचा उमेदवार असेल, जो जिंकू शकेल तशी जागावाटप होईल. आमच्यात कोणतेही मतभेत नाहीत. एखादे अमित शहा दिल्लीतून येऊन आमच्यासमोर बसत नाहीत आणि तुकडे फेकत नाहीत. आम्ही एकत्र बसतो आणि सन्मानाने जागा वाटप करतो. आमचे जागावाटप दिल्लीत होत नाही आणि होणारही नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.

भाजपकडे सक्षम उमेदवार नसल्याने दुसऱ्या पक्षांच्या उमेदवारांची चोरी, नाना पटोले यांचा हल्लाबोल