भाजपकडे सक्षम उमेदवार नसल्याने दुसऱ्या पक्षांच्या उमेदवारांची चोरी, नाना पटोले यांचा हल्लाबोल

लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पुढील आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तारखांची घोषणा होण्याची शक्यता असून त्यानंतर आचारसंहिता लागू होईल. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने 195 उमेदवारांची पहिला यादी जाहीरही केली, मात्र यात महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नाही. जागावाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये एकमत होत नसल्याचेच चित्र असून यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सत्ताधाऱ्यांना डिवचले आहे.

भारतीय जनता पक्षात आता सक्षम उमेदवार नाहीत म्हणून तर ते दुसऱ्या पक्षातील नेते चोऱ्या करून व दबावाने पळवत आहेत. भाजपचे दोन कार्यकर्ते ईडी व सीबीआयही यासाठी कामाला लागले आहेत. भाजपा आता मोदी परिवार झाला असून जिंकण्याचा विश्वासही त्यांच्यात राहिलेला नाही. राष्ट्रीय नेतृत्व म्हणणाऱ्या नितीन गडकरी यांना उमेदवारी मिळेल की नाही हीच शंका आहे. भाजपच्या पहिल्या यादीत या राष्ट्रीय नेतृत्वाचे नाव असायला पाहिजे होते, पण नाही, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, जागावाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये सध्या गडबड सुरू आहे. महायुतीच भांडण सुरू असून भविष्यात फारच भयानक परिस्थिती होणार आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये कोणतीही गडबड नाही. आम्ही योग्यवेळी जागा जाहीर करू.

मिंधे-अजित पवार गटाचे काही उमेदवार कमळ चिन्हावर लढणार, उपमुख्यमंत्र्यांनीच दिली अप्रत्यक्ष कबुली

महायुतीचे काय व्हायचे ते होईल. त्यांना सत्तेची मस्ती असून जनतेचे प्रश्न वाऱ्यावर आहे. धान खरेदी होत नसून पेपरफुटी सुरू आहे. सरकार काहीही पावलं उचलण्यास तयार नाही. यामुळे हुशार मुलांचे नुकसान होत आहे, असेही नाना पटोल म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)