गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार झाला; असीम सरोदेंचा शिंदे गटाच्या आमदारांवर आरोप

मिंधे गटाचे नवेनवे कारनामे उघड होत आहेत. त्यातच आता कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी मिंधे गटाच्या आमदारांवर आरोप केले आहेत. मिंधे गटाने गद्दारी करत गुवाहाटी गाठले होते. यावेळी ते ज्या हॉटेलमध्ये होते. त्याबाबत सरोदे यांनी आरोप केले आहेत. गुवाहाटीत हे आमदार दारुच्या नशेत झिंगत होते, हे सगळ्यांनी पाहिले आहे. दारुच्या नशेत त्यांनी काय केले, याबाबत सरोदे यांनी आरोप केले आहेत. अॅड. असीम सरोदे यांनी धाराशीमध्ये झालेल्या ‘निर्भय बनो’ सभेमध्ये शिंदे गटाच्या आमदारांवर आरोप केले आहेत. तसेच, यासंदर्भात चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही असीम सरोदेंनी केली आहे.

असीम सरोदेंनी आपल्या भाषणात गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये तेव्हा थांबलेल्या एअर होस्टेसचा विनयभंग व त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी कोणत्याही आमदाराचे नाव घेतले नसले, तरी त्यांनी त्यावेळी त्या हॉटेलमध्ये थांबलेल्या शिंदे गटातील बंडखोर आमदारांचा भाषणात उल्लेख केला. गुवाहाटीत ज्या हॉटेलमध्ये हे सगळे थांबले होते, तिथे इतर ग्राहकांना परवानगी नव्हती. पण स्पाईसजेट आणि इंडिगो या दोन विमान कंपन्यांनी त्यांच्यासाठी काही खोल्या तिथे बुक केल्या होत्या. त्या हॉटेलशी त्यांचं वर्षाचं कंत्राट होतं. तिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेस राहात होत्या. त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला गेला. एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कुणी केला? हे महाराष्ट्राने शोधले पाहिजे. दारूच्या नशेत हे नेते झिंगत होते. हा पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही, असे असीम सरोदे म्हणाले.

असीम सरोदेंनी शिंदे गटाच्या बंडावेळी गुवाहाटीमध्ये काय घडलं होतं? यासंदर्भात काही दावे केले आहेत. गुवाहाटीतल्या त्या हॉटेलमधून एक आमदार पळून गेले. 8 किलोमीटर गेल्यानंतर त्यांना पकडून आणले गेले. त्यांना हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली. त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली. त्या दोन आमदारांना कुणी मारहाण केली?” असा सवाल असीम सरोदेंनी उपस्थित केला आहे.