हिंदुस्थान खरेदी करणार 200 ब्राम्होस क्षेपणास्त्रे, 39 हजार 125 कोटींचा करार

हिंदुस्थान सरकारने आज शुक्रवारी तब्बल 39 हजार 125 कोटी रुपयांचे पाच महत्त्वपूर्ण संरक्षण करार केले. या करारा अंतर्गत हिंदुस्थान सरकार 200 ब्राम्होस सुपरसोनिक क्रुझ मिसाईल्स, रडार्स, शस्त्रास्त्रs आणि मीग-29 जेट या लढाऊ विमानांची क्षमता वाढवण्यासाठी इंजिन खरेदी करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण विभागाचे सचिव गिरीधर अरामाने यांच्या उपस्थितीत शस्त्रास्त्र खरेदीसाठीचे करार केले.

या करारांमुळे हिंदुस्थानच्या संरक्षण विभागाची ताकद आणखी वाढेल असे संरक्षण अधिकाऱयांनी सांगितले. ब्राम्होस क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी दोन वेगवेगळे करार करण्यात आले. पहिल्या शस्त्रास्त्र खरेदी करारा अंतर्गत ब्राम्होस एअरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडकडून 19 हजार 518 कोटी रुपयांचे ब्राम्होस क्षेपणास्त्र खरेदीचा करार करण्यात आले. या क्षेपणास्त्रामुळे हिंदुस्थानी नौदलाची ताकद आणखी वाढेल असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. दुसऱया करारा अंतर्गत नौदलासाठी सागरी हल्ल्यासाठी महत्त्वपूर्ण शस्त्रास्त्र खरेदी करण्यात येणार आहे.