शिवडीच्या न्यू आंबेवाडी प्राथमिक शाळेला नवी झळाळी, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार अरविंद सावंत यांच्या खासदार निधीतून पुनर्बांधणी करण्यात आलेल्या शिवडी येथील न्यू आंबेवाडी प्राथमिक शाळेच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा नुकताच शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला.

उपस्थितांना संबोधित करताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी इंग्लंडचे पंतप्रधान टोनी ब्लेयर यांचा एक किस्सा सांगितला. टोनी ब्लेयर यांनी त्यांचे सरकार स्थापन झाल्यावर एका मुलाखतीत देशाच्या विकासाकरिता तुमची प्राथमिकता काय, असा प्रश्न विचारला असता त्यांनी पहिली प्राथमिकता शिक्षण, दुसरी शिक्षण आणि तिसरीही शिक्षणच असल्याचे सांगितले. याच प्राथमिकतेस अनुसरून आगामी काळात आपले सरकार स्थापन झाल्यावर जिल्हा परिषद शाळांचे देखील नूतनीकरण करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

गोरगरीबांच्या मुलांसाठी मुंबई पब्लिक स्कूल सुरू करून आयसीएसई, सीबीएसई बोर्डाचे शिक्षण उपलब्ध करून देणारे, व्हर्च्युअल क्लासरूम, एज्युकेशन टॅबच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा गरीब विद्यार्थ्यांना करून देण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱया आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शाळेच्या इमारतीचे उद्घाटन होणे हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे, अशी भावना यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केली.

लोकार्पण सोहळय़ास शिवसेना विधिमंडळ गटनेते, आमदार अजय चौधरी, उपनेत्या किशोरी पेडणेकर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, विभाग संघटक श्रद्धा जाधव, लोकसभा निवडणूक समन्वयक सुधीर साळवी, उपविभागप्रमुख गजानन चव्हाण, राम साळगावकर, पराग चव्हाण, उपविभाग संघटक रूपाली चांदे, विधानसभा समन्वयक बबन गावकर, विधानसभा समन्वयक गौरी चौधरी, विधानसभा संघटक लता रहाटे, माजी नगरसेवक दत्ता पोंगडे, अनिल कोकीळ, सचिन पडवळ, वैभवी चव्हाण, शाखाप्रमुख जयसिंग भोसले, बैजू हिंदोळे, मिनार नाटळकर, किरण तावडे, विजय इंदुलकर, संघटक कविता माने, कांचन घाणेकर, युवासेना कार्यकारिणी सदस्य पवन जाधव, सुप्रीत म्हात्रे, मुकेश कोळी, युवती अधिकारी तन्मयी जाधव उपस्थित होते.