गद्दार गँग या भाजपच्याच ए व बी टीम, आदित्य ठाकरे यांचा टोला

अर्थंसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवसानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महायुतीतील जागावाटपावरून सुरू असलेल्या वाटाघाटींबद्दल पत्रकारांनी त्यांना विचारले असता ”भाजपसोबत गेलेल्या दोन्ही गद्दार टी या भाजपच्याच ए व बी टीम असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. यावेळी बोलताना त्यांनी मुंबईतील घोटाळ्यांवरून महापालिका आयुक्त व मिंधे सरकारलाही फटकारले.

रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवर नारायण राणे यांनी भाजपचाच उमेदवार लढणार असल्याचे ट्विट केले आहे. त्यावरून सध्या महायुतीत जागावाटपावरून मतभेत सुरू असल्याचे समोर आले आहे. त्याबाबत विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले, ”हे होणारच होतं. पण गद्दार गँग या भाजपच्याच ए व बी टीम आहेत. त्यामुळे त्यातील उमेदवारांना सांगितलं की कमळावर लढा तर ते उडी मारून लागलीच तिथे जातील. त्यांना काहीच पर्याय उरलेला नाही”

कोस्टल रोड उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून तयार झालेला रस्ता आहे आणि आता हे खोके सरकार घाई घाईत याचं उद्घाटन करणार आणि त्याचं श्रेय घेणार. पण पुण्यातली रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो दोन महिन्यांपासून तयार आहे मात्र अद्याप उद्घाटन झालेलं नाही. विमातळावरील टर्मिनल 2 ची बिल्डिंग तयार आहे. पण उद्घाटन रखडलंय. मुंबई विमातळाजवळील एक पूल सहा महिने झाला पूर्ण तयार होऊन पण उद्घाटन झालेलं नाही. नवी मुंबई विमानतळाचं नाव दि बा पाटील करण्याचा प्रस्ताव बदलण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाचे नाव छत्रपती
संभाजी महाराज असं करण्याचा चार वर्षांपूर्वी पाठवलेला आहे. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी त्याचा पाठपुरावा केला. पण अजूनही केंद्र सरकारने ते केलेलं नाही यातून केंद्राचा महाराष्ट्रद्वेष दिसून येतोय”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

गेल्या दोन वर्षात सरकारला एक रुपयाची मदत पोहोचलेली नाही. हे घट नाबाह्य सरकार महाराष्ट्रा्च्या हिताचं नाही. उशीरा व अर्धवट झालेल्या पूलाचं उद्घाटन करायला दोन दोन पालकमंत्री जातात. मात्र डिलाईल रोड ब्रिज असो किंवा गोखलेचा ब्रिज च्या कामात झालेल्या दिरंगाईसाठी रेल्वे अधिकारी, महापालिका आयुक्त या दोघांवरही कारवाई झाली पाहिजे. निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांच्या बदलीचे आदेश देऊनही त्यांची बदली केली जात नाहीए, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले

सेंट्रल विस्टाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाविस्टा तयार करण्याचे या सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला, ”गेल्या दोन वर्षात अनेक कामं सौंदर्यीकरणाच्या नावाखाली केली गेली. त्याच्या नावाखाली 1700 कोटींचा घोटाळा केलाय त्यातून दहा तरी नवीन कामं झालीयत का ती त्यांनी दाखवावी. तसाच हा महाविस्टाचा घोटाळा होणार आहे. रस्त्याचा घोटाळा आहे असं सांगितलं होतं त्यानंतर एकही रस्ता झालेला नाही. अर्धा किलोमीटरचाही रस्ता झालेला नाही. तसाच हा महाविस्टाचा घोटाळा होणार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले,