मुळा-मुठा नद्या वाचविण्यासाठी जनता अदालत घेणार – आदित्य ठाकरे

मुळा-मुठा या नद्यांचा नदीसुधार प्रकल्पामुळे नदीसुधार होत नसून भकास होत आहेत. पुण्यातील पर्यावरणाचा सर्वनाश करण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी दोन्ही नद्यांचे पात्र कमी होत असून भविष्यात गंभीर परिस्थिती ओढवली जाणार आहे. हा प्रकल्प साबरमती नदीकर काम केलेल्या कॉन्टॅक्टरला देण्यात आला आहे. मात्र दोन्ही शहरांतील परिस्थिती केगळी आहे. अशा प्रकल्पामधून गुजरातींचं पोट भरले जात आहे. मुळा-मुठा वाचविण्यासाठी  मार्च महिन्यात जनता अदालत घेणार असून सामान्य जनतेला याविषयी जागृत करण्यात येईल. तसेच बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या कामाचा जाब विचारण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला.

मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स येथे पर्यावरणपेमी संस्थांनी आयोजित केलेल्या परिसंवादात आदित्य ठाकरे बोलत होते. प्रशासक काळात राज्यातील परिस्थिती बिकट बनली आहे. वरून आलेल्या आदेशामुळे अधिकारी कोणाला भेटत नाहीत. उत्तर देत नाहीत. सध्या जगात सर्वत्र नद्यांचा विस्तार केला जात आहे. परंतु पुण्यात उलट सुरू आहे. नदीसुधारमुळे नद्यांचे पात्र अरुंद होत आहे. यामुळे भविष्यात धोका निर्माण होणार असून, अनेक मानवनिर्मित संकटे ओढवतील. अगोदर पात्राच्या शेजारी असणाऱ्या समस्या दूर करून नदीसुधार, सुशोभीकरण करण्यात यावे; परंतु इथे उलट सुरू आहे. हे कामदेखील गुजराती कॉन्ट्रक्टरला देण्यात आले आहे. त्यामुळे हे सरकार महाराष्ट्राचे की गुजरातचे,’’ असा सवालदेखील आदित्य ठाकरे यांनी केला.