आदित्य ठाकरे यांचा आज ठाण्यात शिवसैनिक आणि नागरिकांशी संवाद

महा निष्ठा, महा न्याय आणि महाराष्ट्राचा नारा उद्या रविवारी ठाण्यातही घुमणार आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्या ठाण्यात शिवसेनेच्या 4 शाखांना भेटी देणार आहेत. या दौऱयात आदित्य ठाकरे शिवसैनिक आणि नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

नाशिक आणि जळगाव जिह्यातील दणदणीत संवाद मेळाव्यानंतर आदित्य ठाकरे यांची शनिवारी लालबाग येथे भव्य सभा झाली. त्यानंतर ते रविवारी ठाण्यात ठिकठिकाणी शिवसेनेच्या शाखांना भेटी देणार आहेत. सायंकाळी 6 वाजता आनंदनगर येथील शाखेला आदित्य ठाकरे भेट देणार आहेत. सायंकाळी 7 वाजता मनोरमानगर येथील शाखेला भेट देऊन ते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. रात्री 8 वाजता पाचपाखाडी, चंदनवाडी येथील शिवसेना शाखेला भेट देणार आहेत, तर रात्री 9 वाजता जिजामातानगर येथील शिवसेना शाखेचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. शिवसेना नेते-खासदार राजन विचारे, सचिव वरुण सरदेसाई, उपनेते विजय कदम, जिल्हाप्रमुख केदार दिघे,ओवळा माजिवडा संपर्कप्रमुख नरेश मणेरा, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, समिधा मोहिते, समन्वयक संजय तरे आदी उपस्थित राहणार आहेत.