भारतीय कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे ठाण्यातील कोलशेत येथील गॅनसन्स प्रा. लि. पंपनीतील कर्मचारी-कामगारांना 11 हजार आणि 8 हजार 500 रुपयांची भरघोस पगारवाढ करण्यात आली. पगारवाढीच्या करारावर भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, चिटणीस प्रकाश नाईक, पंपनीच्या वतीने एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडंट पी. जी. मांजरेकर आणि युनिट कमिटी यांनी स्वाक्षऱया केल्या.
गॅनसन्स प्रा. लि. पंपनीत गेली 55 वर्षे भारतीय कामगार सेना ही एकहाती कामगार संघटना आहे. नुकत्याच झालेल्या करारामुळे पहिल्या वर्गाकरिता 11 हजार आणि दुसऱया वर्गाकरिता 8 हजार 500 रुपयांची पगारवाढ मिळाली आहे. त्याचबरोबर वर्षातून दोन वेळा श्री गणेश चतुर्थी आणि होळी सणाकरिता आगाऊ रक्कम मिळणार आहे. करारापोटी थकबाकी कामगारांना मिळणार आहे. करारावेळी पंपनीच्या अधिकाऱयांसह युनिट कमिटीचे अध्यक्ष नरेंद्र जडय़ार, चिटणीस अमोल पाटील, दत्तप्रसाद आरोंदेकर, मनोज पवळे यांनी स्वाक्षऱया केल्या.