कतारच्या तुरुंगातील हिंदुस्थानी नौदलाच्या आठ माजी कर्मचाऱयांची सुटका

कथित हेरगिरीच्या आरोपाखाली तुरुंगात डांबलेल्या भारतीय नौदलाच्या आठ माजी कर्मचाऱयांची कतारने सुटका केल्यामुळे देशाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. या कर्मचाऱयांना कतारने हेरगिरीच्या आरोपाखाली तुरुंगात डांबून फाशीची शिक्षा सुनावली होती.

कॅप्टन (निवृत्त) नवतेज गिल आणि सौरभ वसिष्ठ, अमित नागपाल, एसके गुप्ता, बीके वर्मा, सुगुणाकर पाकला आणि नाविक रागेश हे सातजण मायदेशी परतले. शिक्षा झालेल्या व्यक्तींच्या हस्तांतरणाबद्दल 2015 मध्ये उभय देशांमध्ये द्विपक्षीय करार झाला आहे. या करारात हिंदुस्थान आणि कतारच्या ज्या नागरिकांना गुह्यांसाठी दोषी ठरवून शिक्षा ठोठावण्यात आली आहे त्यांना त्यांच्या देशात त्यांची शिक्षा भोगण्याची तरतूद आहे. या करारातील तरतुदींचा अवलंब या प्रकरणात करण्यात आला.