म्हाडा कोकण मंडळाची लॉटरी 24 फेब्रुवारीला

मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्यामुळे रखडलेल्या म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. 5311 घरांची सोडत येत्या 24 फेब्रुवारीला रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काढण्यात येणार आहे. त्यासाठी ठाण्यात हॉलची शोधाशोध सुरु असून त्यानंतरच सोडतीचे निश्चित ठिकाण आणि वेळ जाहीर केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या 5311 सदनिकांच्या विक्रीकरिता 13 डिसेंबर रोजी सोडत काढण्यात येणार होती.  सोडतीसाठी मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्यामुळे दोन महिने उलटून गेले तरी या सोडतीची नवीन तारीख जाहीर करण्यात आली नव्हती.