बाबा सिद्दिकीचा काँग्रेसचा राजीनामा, उद्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून उद्या (शनिवार) अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश केला होता.

मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. अखेर बाबा सिद्दिकी यांनी आज सकाळी ‘एक्स’वरून आपण काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे आणि गेल्या 48 वर्षांपासून काँग्रेससोबत सुरू असलेले नाते तोडत असल्याचे जाहीर केले.

सरकारी यंत्रणांच्या दबावाचे बळी – वर्षा गायकवाड

भाजपने सरकारी यंत्रणांचा वापर करून पह्डापह्डीचे जे राजकारण  सुरू केले आहे त्याचे बाबा सिद्दिकी हे बळी आहेत, अशी प्रतिक्रिया मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी दिली.