हिंदुस्थानी वंशाचे ऑस्ट्रेलियन खासदार वरुण घोष यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली. अशा प्रकारे शपथ घेणारे वरुण हे ऑस्ट्रेलियाच्या संसदेतील पहिले सिनेटर ठरले. ऑस्ट्रेलियाच्या विधानसभा आणि विधान परिषदेने त्यांची फेडरल संसदेच्या सिनेटमध्ये ऑस्ट्रेलियन राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड केली. त्यानंतर त्यांनी सिनेट सदस्य म्हणून शपथ घेतली. शपथविधीनंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी त्यांचे टीममध्ये स्वागत केले. सिनेट घोष हे त्यांच्या समाजातील लोकांसाठी एक मजबूत आवाज बनतील, असा विश्वास अल्बानीज यांनी यावेळी व्यक्त केला. इतर मंत्र्यांनीही घोष यांचे स्वागत केले. वरुण घोष यांचा जन्म 1985 मध्ये हिंदुस्थानात झाला. हिंदुस्थानात जन्मलेले ते ऑस्ट्रेलियन संसदेचे पहिले सिनेट सदस्य आहेत. घोष हे 1997 मध्ये पर्थला गेले आणि त्यांनी ख्राईस्टचर्च ग्रामर स्कूलमध्ये शिक्षण घेतले. पेंब्रिज विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली.