महापालिकेच्या महिला सुरक्षा रक्षक अजिंक्य

म्युनिसिपल कर्मचारी सेनेकडून गौरव

चंद्रपूर येथे पार पडलेल्या अखिल हिंदुस्थानी कबड्डी स्पर्धेत महिला गटामध्ये मुंबई महानगरपालिका सुरक्षा रक्षक संघाने एमएच स्पोर्टिंग क्लब, पुणे या संघाचा पराभव करून अजिंक्यपद पटकावले.

या कबड्डी स्पर्धेतील अंतिम विजेत्या संघाला चषक व एक लाख रुपयांचे इनाम देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनीही विजेत्या संघाचे कौतुक केले आणि सर्व खेळांडूचा सत्कारही केला. यावेळी कर्णधार अनिता शिंदे, मनीषा चोगले, रोहिणी पाडळे, अंजली रोकडे, पूनम मोरे, गौरी कदम, चैताली मापेलकर, स्वरा मसुरकर, सुप्रिया राऊत, स्वाती डावरे, स्वाती मोकल या कबड्डीपटूंचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, या महिला खेळांडूना महापालिकेचे सुरक्षा रक्षकांना सराव करता यावा म्हणून एकाच पाळीत काम मिळवून देण्याचे आश्वासन बाबा कदम यांनी दिले. याबाबत आयुक्तांकडे मागणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या सत्कारप्रसंगी युनियनचे चिटणीस रामचंद्र लिंबारे, उपाध्यक्ष संजय कांबळे, रंजना नेवाळकर तसेच कबड्डी प्रशिक्षक गौतम शिर्के उपस्थित होते.