अयोध्येत ‘राम’, तर बिहारमध्ये ‘पलटूराम’! नितीश कुमारांच्या राजीनाम्यावर संजय राऊतांची परखड प्रतिक्रिया

नितीश कुमार यांनी पुन्हा पलटी मारत एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी सकाळी त्यांनी राज्यपालांची भेट घेत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आज सायंकाळी भाजपच्या पाठिंब्यावर ते पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारमधील या राजकीय घडामोडीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी परखड प्रतिक्रिया दिली असून अयोध्येत राम तर बिहारमध्ये पलटूराम असल्याचा टोला लगावला.

नगर दौऱ्यावर असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, त्यांना अधुनमधून विस्मरणाचा झटका येतो. वास्तविक पाहता त्यांचे 75 टक्के मानसिक संतुलन बिघडलेले आहे. ज्यावेळेला त्यांचे संतुलन व्यवस्थित होईल, त्यावेळेला ते पुन्हा आमच्यामध्ये येतील, असा खोचक टोला सुद्धा त्यांनी यावेळी लगावला.

ते पुढे म्हणाले की, अयोध्येत राम तर बिहारमध्ये पलटूराम असून याचे राजकारण सुरू आहे. खरे तर पलटूराम भाजपला म्हणावे लागेल. कारण अमित शहा यांना नितीश कुमार यांच्यासाठी सर्व दरवाजे बंद झाल्याचे म्हटले होते. बिहारच्या जनतेला त्यांनी हे वचन दिले होते. त्यामुळे सर्वात मोठे पलटूराम भाजपचे लोक असल्याचा घणाघात राऊत यांनी केला.

इंडिया आघाडी भक्कम

शामध्ये आमची इंडिया आघाडी अतिशय भक्कम आहे. ममता बॅनर्जी आघाडीतून बाहेर गेलेल्या नाहीत. पंजाबमध्ये थोडीफार वेगळी परिस्थिती आहे. दिल्लीमध्ये काँग्रेस व आप हे एकत्र येत आहेत. लवकर त्याची घोषणा होईल. सर्वजण भाजपच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले आहेत. निश्चित त्या-त्या राज्यामध्ये भाजपचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही, असेही राऊत ठामपणे म्हणाले.

Bihar Political Crisis – भाजपचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

भारती जनता पक्ष शिवसेना-काँग्रेसला घाबरत आहे

राहुल गांधी यांची पदयात्रा रोखण्याचा प्रयत्न सुरू झाला. भाजपवाले आता घाबरत आहेत. डर नाही तर तुम्ही घाबरता कशाला? भाजपवाले शिवसेना-काँग्रेसला घाबरत आहे. त्यांनी आमचा सामना करावा, असे जाहीर आव्हान खासदार राऊत यांनी यावेळी केले. ते पुढे म्हणाले की, राज्यामध्ये महाविकास आघाडी मजबूत आहे. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाही. इतर पक्षांबरोबर आमची चर्चा सुरू झालेली आहे. लवकरच आमची एक बैठक 30 जानेवारीला होणार आहे व त्या बैठकीला नेते प्रकाश आंबेडकर हे सुद्धा उपस्थित राहणार असल्याचेही खासदार राऊत स्पष्ट केले.

केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून पक्ष फोडाफोडीचं काम, शरद पवार यांचं भाजपवर शरसंधान