संजय राऊत यांनी घेतले शनी देवाचे दर्शन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी शनिवारी श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे येऊन शनि महाराजांची विधीवत पूजा करून दर्शन घेतले. त्यांच्यासोबत उपनेते साजन पाचपुते, माजी आमदार पांडुरंग अभंग, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, आव्हाड, विश्वस्त दीपक दरंदले, आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

खासदार संजय राऊत यांचे शनिवारी सायंकाळी शनिशिंगणापूर या ठिकाणी करण्यात आले. खासदार राऊत यांनी शनीच्या चौथर्‍यावर जाऊन त्यांनी शनि देवाला तेलाचा अभिषेक केला, या वेळी जय भवानी जय महाराष्ट्र, शनी महाराज की जय अशा घोषणांनी हा परिसर दुमदुमन गेला होता.

यानंतर देवस्थानच्या वतीने अध्यक्ष भागवत बानकर, विश्वस्त दीपक दरंदले व माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी खासदार संजय राऊत यांचा यावेळी देवस्थानच्या वतीने सत्कार केला.

संजय राऊत यांच्यासोबत सेल्फीसाठी गर्दी

खासदार संजय राऊत यांनी शनिशिंगणापूर या ठिकाणी आल्यानंतर नागरिकांनी गराडा घातला, तर एका लहान मुलाने मला फोटो काढायचे असे म्हटल्यानंतर खासदार संजय राऊत हे थांबले व त्या मुलासोबत त्यांनी फोटो घेतला त्यानंतर अनेकांनी सेल्फी फोटो घेण्यासाठी गर्दी केली.