जरांगे पाटलांच्या केसालाही धक्का लावाल तर याद राखा, नाना पटोले यांचा सरकारला इशारा

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांना लाखो लोकांसोबत मुंबईत यावे लागले याला शिंदे-भाजपा सरकार जबाबदार आहे, या सरकारचे हे पाप आहे. जरांगे पाटील यांना रोखणार नाही असे सरकारने उच्च न्यायालयात सांगितले आहे. आरक्षण देणारच अशी भूमिका शिंदे-भाजपा सरकारने जाहीर करुन जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केल्या मग अजून आरक्षण का दिले जात नाही. सरकार बनवाबनवी करत असल्याने मराठा समाजात तीव्र संताप आहे, त्यातून त्यांना मुंबईत यावे लागले, असे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

भाजपा सरकारकडे राज्यात व केंद्रात पाशवी बहुमत आहे मग आरक्षण देण्यात काय अडचण आहे. भाजपा सरकार आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा समाज, ओबीसी, धनगर समाजाची चेष्टा करत आहे. तुम्हाला आरक्षण देता येत नसेल तर खूर्ची खाली करा, आम्ही आरक्षण देऊ असे म्हणत जरांगे पाटील यांना सुरक्षा देण्याची जबाबदारी सरकारची आहे, त्यांच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा सरकारला सळो की पळो करुन सोडू, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

धर्मांध शक्तींना सत्तेतून बाहेर फेकण्याचा संकल्प करा, प्रजासत्ताक दिनी नाना पटोलेंचे आवाहन

नगर परिषद नोकर भरती प्रकरणी सरकारकडून दिशाभूल

नगरपरिषदेतील नोकर भरतीमध्ये रिक्त सर्व संवर्गातील पदांची भरती करावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. 2022 च्या शासन आदेशानुसार शंभर टक्के भरती करण्यास मुभा असताना 2023 साली काढण्यात आलेल्या नोकर भरतीत केवळ 40 टक्केच पद भरती केली जात आहे. 100 टक्के पद भरती करावी यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे विद्यार्थ्यांनी पत्राद्वारे मागणी केलेली आहे पण सरकार मुलांची दिशाभूल करत आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)