शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 98व्या जयंतीनिमित्त मंगळवार, 23 जानेवारीला शिवसेनेच्या वतीने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुंबईसह राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सहार कार्गोच्या वतीने आरोग्य तपासणी, कॅरम स्पर्धा

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील सहार कार्गो विभागात काम करणाऱ्या कामगारांसाठी भारतीय कामगार सेनेच्या वतीने भव्य कॅरम स्पर्धा व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. विविध कंपन्यांतील 40 हून अधिक कामगारांनी कॅरम स्पर्धेत सहभाग घेतला होता. आरोग्य तपासणी शिबिरातही 220 हून अधिक कामगारांची तपासणी करण्यात आली. याशिवाय अस्थमा, बीएमआय, ईसीजी, डोळे तपासणीसह इतर आजारांवरही तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. अतिशय चांगल्या वातावरणात हे दोन्ही कार्यक्रम पार पडले. कॅरम स्पर्धेचे पारितोषिक वितरण भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय शंकर कदम यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

कार्यक्रमाला मियालचे वरिष्ठ उपाध्यक्ष व कार्गोप्रमुख मनोज सिंह, भारतीय कामगार सेनेचे चिटणीस सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे, दिलीप भट, सहचिटणीस विजय शिर्के, संजीव राऊत, मिलिंद तावडे, निलेश ठाणगे, विजय तावडे, शाखाप्रमुख राजू नाईक, वाहतूक सेनेचे धनंजय परब आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यकारिणी सदस्य शिवप्रसाद ठाकूर, कमिटीच्या वतीने विजय गोसावी, महेंद्र सुर्वे, संदीप केणी, प्रवीण पाटील, अमित मोहिते, संकेत बामणे, कामराज नाडार, नितीन सावंत, विमल सिंह, रवी लोणके, महेश सावंत यांनी विशेष मेहनत घेतली.

वर्सोव्यात रक्तदान शिबीर 

वर्सोवा विधानसभा शाखा क्रमांक 60 च्या वतीने महात्मा गांधी रक्तपेढीच्या सहाय्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात 102 रक्त पिशव्या  जमा झाल्या. शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी विधानसभा समन्वयक बाळा आंबेरकर, उपविभागप्रमुख राजेश शेटये, पुणे जिल्हा (ग्रामीण) महिला संपर्क संघटक मेघना काकडे-माने, गायकवाड सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष विजय जाधव, डॉ. किशोर झा, शाखेचे सर्व महिला पुरुष, उपशाखाप्रमुख, शिवसैनिक उपस्थित होते. या शिबिराचे आयोजन शाखाप्रमुख सिद्धेश चाचे, शाखा संघटक आश्विनी खानविलकर यांनी केले होते.

गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप

शाखा क्रमांक 177 आणि साईलीला प्रतिष्ठान (रजि) माटुंगा यांच्या वतीने विभागातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप रविवार, 28 जानेवारीला संध्याकाळी 5.30 वाजता माटुंगा मार्केट येथील  भिवंडीवाला बिल्डिंग इथे शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई, विभागप्रमुख महेश सावंत, विभाग संघटक श्रद्धा जाधव, नगरसेविका उर्मिला पांचाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन शाखाप्रमुख आणि साईलीला प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप चिवटे यांनी केले आहे.

रुग्णांना फळवाटप 

शिवसेना शाखा क्रमांक 2 च्या वतीने रविवारी विविध रुग्णालयांतील रुग्णांना फळवाटप करण्यात आले. यावेळी डॉक्टर अमित सिंह, श्वेतांक यादव, विधानसभा संघटक अविनाश लाड, शर्मिला पाटील, विधानसभा समन्वयक रोशनी कोरे-गायकवाड, शाखाप्रमुख सुधाकर राणे, शाखा संघटक मानसी म्हातले, शाखा समन्वयक हेमा तांबट, कार्यालयप्रमुख सुहास धानुका यांच्यासह उपशाखाप्रमुख, उपशाखा संघटक, शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

महाआरोग्य शिबीर 

शिवसेना शाखा क्रमांक 131 आणि 125 च्या वतीने आणि के. जे. सोमय्या रुग्णालयाच्या सहकार्याने महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी ईशान्य मुंबई विभागप्रमुख सुरेश पाटील, उपविभागप्रमुख संजय दरेकर, विधानसभा प्रमुख अवी राऊत, विधानसभा संघटक अजित भाईजे, शाखाप्रमुख अजित गुजर, मयूरेश नामदास, संजय कदम, शाखा संघटक पूनम परब, शाखा समन्वयक नीलम कदम, श्यामराव चाफेकर, दिवाणजी भोसले, दिनकर मांडले, प्रीतम शिर्के, राजेंद्र मोहिते, उपशाखाप्रमुख राजा पवार, नितीन गंभीर उपस्थित होते.