प्रभादेवीत शनिवारी शिवसैनिकांचा मेळावा; आदित्य ठाकरे करणार मार्गदर्शन

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गिरगावमध्ये पार पडलेल्या शिवसैनिकांच्या दणदणीत मेळाव्यानंतर शनिवारी संध्याकाळी 6 वाजता प्रभादेवीतील नागूसयाजी वाडी येथे शिवसैनिकांचा भव्य मेळावा होणार आहे. मेळाव्याला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.

महाराष्ट्रातीत मिंधे सरकारने केंद्रातील भाजपच्या सरकारला सोयीचे होतील असे निर्णय घेऊन महाराष्ट्राला मान खाली घालायला लावली आहे. राज्यातील नाकर्त्या सरकारविरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या संतापाला वाट मोकळी करून देण्याचे काम आदित्य ठाकरे करणार आहेत. यावेळी शिवसेना नेते दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, उपनेते सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे, विभागप्रमुख महेश सावंत, महिला संघटक श्रद्धा जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.