गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वधारत असलेल्या मुंबई शेअर बाजारात बुधवारी अक्षरशः दाणादाण उडाली. सेन्सेक्स 1628 अंकांनी घसरला. 16 महिन्यातील ही विक्रमी घसरण आहे. यामुळे गुंतवणुकदार हवालदील झाले असून, एका दिवसात तब्बल 4.7 लाख कोटी रूपये बुडाले. दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्येही 460 अंकांनी घसरण झाली.
शेअर बाजार उघडताच बँकाRग आणि वित्तीय शेअर्सची विक्रमी घसरण सुरू झाली. ही घसरण दिवसभर सुरूच होती. आयटी पंपन्यांचे शेअर्स वगळता इतर सर्व शेअर घसरले. बाजार बंद होताना सेन्सेक्स 1628 अंकांनी घसरला होता. एका दिवसांत तब्बल 2.23 अंकांची घसरण झाली. बाजार 71500 अंकांवर स्थिरावला. निफ्टीचा अंकही 460 ने घसरूण 21571 वर स्थिरावला होता.