काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी आज अंमलबजावनी संचलनालयावर (ईडी) सडकून टीका केली आहे. ‘आपली ईडी ही इडीयट आहे’, अशा शब्दात त्यांनी ईडीला फटकारले आहे.
ईडीने त्यांना जम्मू-कश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी बोलावले आहे.2022मध्ये या प्रकरणी दोषारोपपत्र ईडीकडून दाखल करण्यात आले होते. यात फारूक अब्दुल्ला यांच्यासह जम्मू-कश्मीर क्रिकेटअसोसिएशनचे अधिकारी अहसान अहमद मिर्झा, मीर मंजूर गजानफर यासह अन्य लोकांना आरोपी बनवले होते. ईडीने जम्मू-कश्मीरमधील एका न्यायालयात हे दोषारोपपत्र दाखल केले होते. यात फारूक अब्दुल्ला यांच्यासह अन्य लोकांनी मनी लॉण्ड्रिंगचे आरोप करण्यात आले होते.
त्यावर बोलताना अधिर रंजन चौधरी यांनी ईडी व भाजप सरकारवर टीका केली आहे. ”ईडी कुणाला नोटीस बजावणार आणि कुणाला नाही हे ईडीचा प्रश्न आहे. आम्हाला फक्त हेच माहित आहे की ईडी ही इडियट असून ती फक्त केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर चालते”, अशी टीका अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे.