दोन वर्षांपूर्वी हनुमान चालिसा पठणचा दिखावा करणाऱ्या राणा दाम्पत्याला गुरुवारी विशेष सत्र न्यायालयाने पुन्हा एकदा झापले. न्यायालयाने राणा दाम्पत्याल 19 तारखेला हजर न राहिल्यास वाँरट काढण्यात येईल असा इशारा दिला आहे. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावण्याची सूट मागणाऱ्या राणा दाम्पत्याची ही विनंती देखील न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी फेटाळून लावली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ बंगल्याबाहेर राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा पठण करण्याचा दिखावा केला होता. याप्रकरणी दोघांना अटक झाली होती. या प्रकरणात दोषमुक्ततेसाठी दोघांनी केलेला अर्ज न्यायालयाने अलिकडेच फेटाळला होता.