>> प्रसाद नायगावकर
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल म्हणजे घटना, कायद्याचा मुडदा पाडून दिल्लीच्या मदतीने महाराष्ट्रावर केलेला आघात आहे. विधानसभा अध्यक्षांनी प्रत्यक्षात लोकशाहीचे तोंड जगात काळे करणारा निर्णय दिला आहे. इतिहास घडवण्याची संधी त्यांनी गमावली, असा घणाघाती आरोप शिवसैनिकांनी करीत या निर्णयाचा निषेध व्यक्त करीत विधानसभा अध्यक्षांचे निर्णया विरोधात शिवसैनिकांनी तीव्र आंदोलन केले आहे. गद्दार सेनेचा निषेध असो, खोके सरकारचा निषेध असो. शिवसैनिकांच्या या गर्जनेने यवतमाळ दणाणला, राहुल नार्वेकरांच्या प्रतिमेला महिला शिवसैनिकांनी चांगलेच जोड्याने चोपले आणि आपला राग व्यक्त केला.
आपल्यामागे दिल्लीची महाशक्ती आहे. चिंता नको’, असे शिंदे वारंवार फुटीर आमदारांना सांगत राहिले, पण राहुल नार्वेकर घटनेच्या पदावर बसून असत्य सांगतात की, या सगळय़ाशी भाजपचा संबंध नाही. महाराष्ट्रातील चोर मंडळास मान्यता देण्यासाठी घटनेची पायमल्ली केली. ज्यांनी हे केले त्यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही! हा निकाल घटनेच्या विरुद्ध आहे, नार्वेकरांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला, हे भाजपचे शिवसेना संपवण्याचे षडयंत्र आहे ते कधीही यशस्वी होऊ देणार नाही अशी प्रतिक्रीया यवतमाळचे संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड,यांनी केले .
या आंदोलनात यवतमाळ संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड,जिल्हा समन्वयक,माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार,जिल्हाप्रमुख संतोष ढवळे,कल्पनाताई दरवई,,सागरताई पुरी,प्रविण पांडे, गजानन डोमाळे, किशोर इंगळे, संजय रंगे, तालुका प्रमुख विनोद पवार आणि सर्व शहर प्रमुख अमोल धोपेकर, युवा सेना जिल्हाधिकारी, महीला आघाडी,व्यापारी सेना पदाधिकारी उपस्थित होते .