हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार 6 डिसेंबर 1992 रोजी थेट अयोध्येत धडक देऊन प्रभू श्री रामचंद्रांची जन्मभूमी मुक्त करण्याचे कर्तव्य बजावलेल्या शिवसैनिकांची बैठक शुक्रवार, 12 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता शिवसेना भवन, दादर येथे आयोजित करण्यात आली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते सुभाष देसाई हे या बैठकीस मार्गदर्शन करणार आहेत. तरी सदर मोहिमेवर गेलेल्या शिवसैनिकांनी या बैठकीस अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून करण्यात आले आहे. तसेच ज्यांना या बैठकीस उपस्थित राहणे शक्य होणार नसेल त्या कारसेवेस जाऊन आलेल्या शिवसैनिकांनी आपली माहिती 9699886677 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावी.