त्या गद्दारांची अवस्था इटलीतल्या मुसोलिनीसारखीच होणार, संजय राऊत यांनी फटकारले

गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल अखेर बुधवारी लागला. शिवसेनेतील पक्षप्रमुख हे पद अमान्य करत विधीमंडळातील बहुमताच्या आधारे त्यांनी हा निकाल दिला आहे. हा निकाल धक्कादायक असल्याचे मत अनेक जाणकारांनी व्यक्त केले. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णायवरून सध्या त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी या निर्णयावर प्रतिक्रीया देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि गद्दार मिंधे गटाला फटकारले आहे. ”बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी गद्दारी करून महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या गद्दारांची अवस्था ही इटलीतल्या मुसोलिनीसारखीच होणार”, अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे.

”आजचा निकाल हा दिल्लीवरून आला होता. त्याचा ड्राफ्ट दिल्लीत बसलेल्यांनी तयार केलेला. हा निकाल संविधान, कायदे, नियम यांच्या आधारे सत्याच्या बाजूने दिलेला नाही. सत्य काय आहे ते या निकालात नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी 60 वर्षांपूर्वी जी शिवसेना स्थापना केली त्यावेळी आताचे जे शिवसेनेचे मालक आहेत त्यांचा जन्म झाला होता का? आज बाळासाहेबांची शिवसेना इतिहास जमा करायची हे भाजपचं हे षडयंत्र होतं, त्यांचं ते स्वप्न होतं. ते स्वप्न पूर्ण करायला त्यांना एका मराठी माणसाने मदत केली आहे. पण शिवसेना कधीच संपणार नाही. तुमच्या भाड्याच्या टट्टूने दिलेल्या निर्णयावर शिवसेना संपणार नाही. आजचा जो निर्णय आहे तो निर्णय नाही एक षडयंत्र आहे. या षडयंत्राविरोधात आम्ही न्यायालयात जाणार, असे संजय राऊत म्हणाले.

”हे जे कुणी अध्यक्ष आहेत ज्यां सर्वोच्च न्यायालयाने ट्रिब्युनलचा अधिकार दिलेला. त्यांना इतिहास निर्माण करण्याची संधी होती. त्यांनी ती संधी गमावाली आहे. या व्यक्तीनेही महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसलाय. इतिहास हे लक्षात ठेवेल. ज्यांनी कुणी हा निर्णय दिलाय. आज जे या निर्णयानंतर जल्लोष करतायत ते महाराष्ट्राचे गद्दार आहेत त्यांची स्थिती मुसोलिनीसारखी होणार. ही मॅच फिक्सिगच आहे. हे मॅच फिक्सिंग शिवाय दुसरं काही असूच शकत नाही. प्रभू श्रीराम यांचं नाव घेण्याचा यांना अधिकार नाही. राम वडिलांसाठी वनवासात गेलेले. आणि या लोकांनी आपल्या राजनितीक वडिलांच्या शिवसेनेला वनवासात पाठवले आहे”, अशी सणसणीत टीका संजय राऊत यांनी केली आहे.

60-65 वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवेसना स्थापन केली. ती शिवसेना कुणाची त्याचा निर्णय भाजपने नेमलेला एक व्यक्ती करणार का? जे दिल्लीचे आदेश पाळतात त्या विधानसभा अध्य़क्षांना काय अधिकार आहे हा निर्णय देण्यााचा? ते शिवसेनेचे भविष्य काय ठरवणार? बाळासाहेबांची शिवसेना चोरमंडळाच्या हातात देण्याचा अधिकार कुणी दिला त्यांना . बाळासाहेबांच्या शिवसेनेची ही अवस्था करणं त्याला मातीमोल करण्याचा प्रयत्न करणं हा महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा अघोरी प्रकार आहे. पण शिवसेना यातून उभी राहतेय. आमचं आव्हान आहे की आता निवडणूक घ्या म्हणजे कळेल की शिवसेना नक्की कुणाची आहे ते, असे आव्हान संजय राऊत यांनी मिंधे गटाला दिले आहे.

”इलेक्शन कमिशन चोरांचे सरदार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने गोगावलेंचा व्हिप बेकायदेशीर ठरवला होता. सुनील प्रभूंचा व्हीप योग्य ठरवलेला. राज्यपालांची कृती बेकायदेशीर आहे. राज्यपालांना बहुमतच ठरवण्याचा अधिकार नाही असे सर्वोच्च न्यायालय म्हणाले होते. आता तुम्ही सांगा की सर्वोच्च न्यायालय शहाणं की हे दीड शहाणे शहाणे आहेत?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

”भाजपचं स्वप्न होतं बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला महाराष्ट्राच्या मातीतून उखडून फेकायचे होते त्यांना. ते काम घटनात्मक जागेवर बसलेल्या मराठी व्यक्तीने केला आहे. त्या व्यक्तीची देखील अवस्था मुसोलिनीसाऱखी होणार हे माझे शब्द लिहून ठेवा. 11 कोटी जनतेच्या पाठित खंजीर खुपसण्याचे काम एक मराठी माणूस राहुल नार्वेकर यांनी केलेले आहे. त्यांनी महाराष्ट्रद्रोह्यांशी हातमिळवणी केली. महाराष्ट्राच्या पाठित खंजीर खुपसला. विधानसभा अध्यक्ष किती खोटारडेपणाने वागले आहेत हे सर्वोच्च न्यायालयात सिद्ध करू’, असे संजय राऊत म्हणाले.

”श्रीरामाचं नाव घ्यायाचा त्यांना अधिकार नाही. ज्या मायबाप शिवसेनेने तुम्हाला सर्वकाही दिलं त्या शिवसेनेला गुलाम करण्याचं काम यांनी केलं. त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 लोकांनी बलिदान दिलं आहे. आम्ही देखील शिवसेनेसाठी जीव द्यायला तयार आहोत’, असे संजय राऊत म्हणाले.

‘कोण एकनाथ शिंदे, कोण भरत गोगावले. त्यांची लायकी आहे का बोलायची? कोण विधानसभा अध्यक्ष? त्यांना अधिकार आहे का हा निर्णय घेण्याचा? बेकादेशीर विधानसभा अध्यक्षांनी हा बेकायदेशीर निर्णय घेतलेला आहे. त्यांचे निकालपत्र दिल्लीवरून ड्राफ्ट करून आलेलं आहे. मी सांगू शकतो ते कुणी लिहलेलं आहे. पण तुम्ही लक्षात ठेवा कितीही प्रयत्न केले तरी शिवसेना संपणार नाही. कितीही प्रयत्न करा. कितीही खोके आणा बाळासाहेब ठाकरे यांची ही शिवसेना संपणार नाही. आम्ही कुणाच्या मेहेरबाणीवर जगत नाही. आम्ही हौतात्म्या पत्करायाला तयार आहोत. आमदार खासदारांवर पक्ष चालत नाही. एकनाथ शिंदे यांनी जे काही पाप केलंय त्यासाठी इतिहास त्यांना क्षमा करणार नाही. हा लोकशाहीतील एक काळा दिवस आहे. मराठा माणसासाठी हा अत्यंत काळा दिवस आहे, असे संजय राऊत ठणकावून सांगितले आहे.