मी गुजरातचा असल्याचा मला अभिमान आहे. रिलायन्स ही गुजराती कंपनी आहे. त्यामुळे गुजरातींचे स्वप्न पूर्ण करण्यात रिलायन्स कंपनी कुठेच कमी पडणार नाही, असे आश्वासन देशाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती व रिलायन्स कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी दिले आहे. वायब्रंट गुजरात समिटच्या निमित्ताने ते बोलत होते.
यावेळी त्यांनी गेल्या दहा वर्षांत सर्वाधिक गुंतवणूक देखील गुजरातमध्ये केल्याचे त्यांनी सांगितले. ”जेव्हा कधी परदेशी नवीन हिंदुस्थानचा विचार करतात, तेव्हा ते गुजरातचा विचार करतात. रिलायन्सने गेल्या 10 वर्षात हिंदुस्थानात 12 लाख कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यातील तब्बल एक तृतीयांश म्हणजे सर्वाधिक गुंतवणूक गुजरातमध्ये केली आहे. मी वचन देतो की गुजरातींचे स्वप्न पूर्ण करण्यात रिलायन्स कुठेच कमी पडणार नाही’, असे आश्वासन मुकेश अंबानी यांनी यावेळी दिले.
धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्स सुरू करणार
गुजरातच्या जामनगरमध्ये 5 हजार एकरच्या जागेत रिलायन्सकडून धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्स सुरू करण्यात येणार आहे. या कॉम्प्लेक्समध्ये ग्रीन प्रोडक्ट तयार केले जाणार याचा फायदा गुजरातला हरित उत्पादनात देशात अग्रेसर बनवण्यात होऊ शकतो