2018 मध्ये मंत्रालयातील अधिकाऱयाला धमकी दिल्याप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. फिर्यादी सनदी अधिकारी प्रदीप पी. यांनी सोमवारी विशेष सत्र न्यायालयात साक्ष नोंदवली. 26 सप्टेंबर 2018 रोजी बच्चू कडू व त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रदीप पी. यांच्या केबिनमध्ये प्रवेश केला आणि महापरिक्षा वेब पोर्टलमधील त्रुटींच्या मुद्दय़ावरून जाब विचारला. यावेळी बच्चू कडू यांनी धमकी व शिवीगाळ देत हल्ला करण्याच्या हेतूने आयपॅड उगारला, असे फिर्यादी प्रदीप पी. यांनी न्यायालयात सांगितले. याप्रकरणी 30 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.