ऑस्कर पुरस्कारांची नांदी समजल्या जाणाऱया गोल्डन ग्लोब पुरस्कारांवर अपेक्षेप्रमाणे ख्रिस्तोफर नोलन यांच्या ‘ओपेनहायमर’ने बेस्ट ड्रामा पुरस्कारासह पाच पुरस्कार जिंकून मोहोर उमटवली. तर, ‘पुअर थिंग्ज’ चित्रपटाने बेस्ट कॉमेडी व म्युझिकल विभागात ‘बार्बी’वर मात केली.
ओपेनहायमरने सर्वोत्तम दिग्दर्शक (नोलन), सर्वोत्तम अभिनेता – सिलियन मर्फी, सर्वोत्तम सहायक अभिनेता – रॉबर्ट डाऊनी ज्यू आणि संगीत या विभागांतही आपली मोहोर उमटवली. बेस्ट कॉमेडी विभागातील सर्वोत्तम पुअर थिंग्ज चित्रपटातील अभिनयासाठी एमा स्टोन विजेती ठरली. सुप्रसिद्ध दिग्दर्शक मार्टीन स्कॉर्सिसी यांच्या किलर्स ऑफ द फ्लॉवर मून या बहुचर्चित चित्रपटात लिओनार्दो द पॅप्रियो याची सहकलाकार असलेल्या लिली ग्लॅडस्टोन विभागातील सर्वोत्तम अभिनेत्री ठरली.