राजस्थानचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना मोठा झटका बसला आहे. करणपूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रुपिंदरसिंह कुन्नर यांनी भाजप सरकारमधील नवनियुक्त मंत्री आणि भाजप उमेदवार सुरेंद्रपालसिंह टीटी यांचा 12 हजार 570 अशा मताधिक्याने पराभव केला आहे. पोटनिवडणुकीत विजय मिळवण्याआधीच सुरेंद्र सिंह यांना भाजपने मंत्री केले होते. त्यामुळे करणपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची जोरदार चर्चा सुरू होती. काँग्रेस उमेदवार आणि तत्कालीन आमदार गुरमीतसिंह कुन्नर यांच्या निधनामुळे या ठिकाणचे मतदान स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली. काँग्रेसला याचा फायदा लोकसभेत नक्की मिळेल, असा विश्वास गेहलोत यांनी व्यक्त केला आहे.