शिवसेनेचा झंझावात आता संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाला आहे. शनिवारी गिरगावमधील ठाकूरद्वार येथे पहिला मेळावा दणक्यात पार पडला. या मेळाव्यात अफाट गर्दीच्या साक्षीनेच आदित्य ठाकरे यांनी रणशिंग फुंकले. या झंझावाताचा पुढचा टप्पा हा सातारा व कोल्हापूर आहे. येत्या 9 जानेवारीला आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर येथे तर 10 जानेवारीला सातारा येथे मेळावा पार पडणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे मेळावे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. निष्ठा आणि न्यायाच्या परिसीमा या मेळाव्यांतून अधोरेखित होणार आहेत. शिवसेनेचे नेते, उपनेते आणि पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.