पंजाबमधील सर्व शाळा 14 जानेवारीपर्यंत बंद

पंजाबमधील सर्व शाळा 14 जानेवारीपर्यंत बंद राहणार असल्याचे आदेश मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिले आहेत. देशभरात थंडीच्या वाढत्या प्रकोपामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

देशात सध्या शीतलहर असल्याने अनेक राज्यांमध्ये तापमान एकेरी आकड्यावर येऊन स्थिरावलं आहे. येत्या काही दिवसांत शीतलहर आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पंजाब राज्य सरकारने सर्व शासकीय आणि खासगी शाळांना 14 तारखेर्यंत सुट्टी दिल्याचं जाहीर केलं आहे.

यापूर्वी शीतलहरीमुळे शाळेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले होते. शाळेची वेळ सकाळी 10 ते दुपारी 3 अशी करण्यात आली होती. मात्र, शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या नव्हत्या. मात्र, वाढत्या शीतलहरीमुळे शाळांना आठवडाभर सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.