वारकरी प्रबोधन महासमिती (महाराष्ट्र) यांच्या वतीने पांडुरंग द्वितपपूर्ती भव्य पालखी सोहळा राम मंदिर हा कॉटन ग्रीन ते वडाळा विठ्ठल मंदिर ते पाच मैदान मुंबई येथे संपन्न झाला. या सोहळ्यात ‘दैनिक सामना’च्या वतीने देण्यात येणारा समाज प्रबोधन पुरस्कार यंदा ह.भ.प. नवनाथ महाराज आंधळे यांना प्रदान करण्यात आला आहे. वारकरी समितीचे अध्यक्ष ह भ प रामेश्वर महाराज शास्त्री, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
वारकरी प्रबोधन महासमिती (महाराष्ट्र) यांचा वतीने श्री.पांडुरंग द्वितपपूर्ती भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात वारकरी प्रबोधन महासमिती (महाराष्ट्र) यांचा वतीने ह.भ.प. नवनाथ महाराज आंधळे यांना समाज प्रबोधन पुरस्कार देण्यात आला.
‘दैनिक सामना’च्या वतीने देण्यात येणारा वारकरी रत्न पुरस्कार ह भ प तुळशीराम महाराज सरकटे यांना तर संत हैबतीबाबा वारकरी सेवा पुरस्कार ह भ प वासुदेव महाराज महल्ले यांना देण्यात आला. तर वारकरी कृतज्ञता पुरस्कार दैनिक सामनाचे नॅशनल हेड ( मार्केट डेव्हलपमेंट) दिपक शिंदे यांना देण्यात आला. वारकरी महाप्रबोधन समिती अध्यक्ष ह.भ.प रामेश्वर महाराज शास्त्री व सचिव, नाना निकम यांच्या हस्ते या सगळ्यांना सन्मानित करण्यात आले. पुढल्या वर्षी या सोहळ्याचा रौप्य महोत्सव असून हा सोहळा दिमाखदार होण्याकरिता शिवसेना पूर्ण मदत करेल, असे खासदार अरविंद सावंत यांनी समितीला आश्वस्त केले.