जगण्याची आशा सोडलीय, तुरुंगात मृत्यू आलेला बरा; नरेश गोयल यांनी न्यायाधीशासमोर मांडली व्यथा

कॅनरा बँकेतील 538 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीचा आरोप असलेले आणि जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांनी शनिवारी एका विशेष न्यायालयात हात जोडून आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. आपण जगण्याची आशा सोडून दिली आहे. अशा परिस्थितीत जीवन जगण्यापेक्षा तुरुंगामध्ये मेलो तर बरे होईल, असा आक्रोश व्यक्त करीत 70 वर्षीय नरेश गोयल यांनी थरथरत्या हाताने न्यायमूर्ती समोर आपली व्यथा मांडली.

माझी आणि पत्नीची प्रकृती खूप बिघडली आहे. पत्नी आजारी असून मुलगी अंथरूणाला खिळून पडली आहे. जेजे हॉस्पिटलमध्ये पत्नीला घेऊन जाण्यास अनेक अडचणी येत आहेत. कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या पत्नी अनिताची आपल्याला खूप आठवण येत आहे, असे गोयल यांनी न्यायालयात सांगितले.