मुंबईच्या रुपिका ग्रोव्हरचे अनोखे यश

देशातील विवाहित महिलांसाठी असणाऱया ‘मिसेस इंडिया वन इन अ मिलियन 2023’ या सौंदर्य स्पर्धेत मुंबईच्या रुपिका ग्रोव्हरने वयाच्या 55 व्या वर्षी विजेतेपद पटकावले आहे. विवाहित महिलांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हाच या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धेमध्ये विजय मिळवण्यासाठी रूपिकाने नृत्यदिग्दर्शक संदिप सोपारकर, फॅशन डायरेक्टर व पेजंट ट्रेनर कविता खरायत यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी केली होती. या स्पर्धेत रुपिकाने ‘मिसेस इंडिया वन इन अ मिलियन 2023’ हा ताज व ‘बोल्ड अँड ब्युटीफुल क्लासिक’, ‘फिट क्लासिक’, आणि ‘टॅलेंटेड क्लासिक’ यासह अनेक टायटल्स जिंकले. रुपिका वकील असून एक उत्तम मॉडेल व अभिनेत्रीही आहे. तिचा प्रवास सर्व वयोगटातील लोकांसाठी खूप प्रेरणादायी आहे.