चंद्रपूर – पेट्रोल पंपावर धाडसी दरोडा, सीसीटीव्ही फूटेजवरून पोलिसांचा शोध सुरू

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या तेलंगणा सीमेवरच्या आसिफाबाद मार्गावरील पेट्रोल पंपावर धाडसी दरोडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री 2 वाजताच्या सुमारास बंदूक व धारदार शस्त्र घेऊन चेहरा झाकलेल्या 5-6 युवकांनी पंपावरील केबिनमध्ये प्रवेश केला. हातातील बंदूक़ व धारदार शत्राच्या धाकाने 2 लाखांची रोकड घेऊन दरोडेखोर पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पहाटे पोलीस अधीक्षक आणि वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.  या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज व टोल नाक्यावरील नोंदी तपासून आरोपींचा शोध घेतला जातोय. या मार्गावर हा पंप नव्यानेच सुरू झाला आहे. पोलिसांची वेगवेगळी पथके शोधकार्यात गुंतली आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.