सूर्याच्या अभ्यासासाठी सोडलेल्या आदित्य एल1 अवकाशयानाला सूर्यसुसंगत कक्षेतील एल1 बिंदूस्थळी नेऊन ठेवण्यासाठी महत्त्वपूर्व कक्षाबदल इस्रोकडून उद्या शनिवारी दुपारी 4 वाजता करण्यात येणार आहेत. पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील एकूण अंतराच्या एक टक्का अंतरावर म्हणजेच 15 लाख किमीवर हे एल1 बिंदूस्थळ आहे. या बिंदूपासून सूर्याचा अभ्यास करताना सौरवादळे, ग्रहण आदी कशाचाही अडथळा आदित्य वरील निरीक्षण यंत्रणेला येणार नाही. हा कक्षाबदल केला नाही तर यानाचा सूर्याच्या दिशेने प्रवास सुरूच राहील.