संसदेवरील स्मोकबॉम्ब हल्ला प्रकरणातील, दोघांची नार्को आणि ब्रेन मॅपिंग चाचणी

13 डिसेंबर रोजी संसदेत घुसून स्मोकबॉम्ब फोडल्याप्रकरणी सहा आरोपींपैकी पाच जणांची पॉलीग्राफ चाचणी करण्यात येणार आहे. तर मनोरंजन आणि सागर या दोघांच्या नार्को आणि ब्रेन मॅपिंग चाचणीसाठी दोघांनी न्यायालयात आपली सहमती दर्शवली आहे.

अमोल, ललित आणि महेश या तिघांनी पॉलीग्राफ चाचणीसाठी न्यायालयात सहमती दर्शवली, मात्र सहावी आरोपी नीलम आझादने मात्र पॉलीग्राफ चाचणी करण्यासाठी नकार दिला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात शुक्रवारी याप्रकरणी सुनावणी झाली. अतिरिक्त न्यायाधीश हरदीप कौर यांनी दिल्ली पोलिसांनी मागणी केल्यानुसार सर्व आरोपींना 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली.