राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीशी संबंधित काही ठिकाणांवर शुक्रवारी सकाळी ईडीने छापेमारी केली. यावरप प्रतिक्रीया देताना सुप्रिया सुळे यांनी भादपला फटकारले आगहे.
”ही पहिली वेळ नाही. याआधी माझ्या बहिणीच्या घरावर छापेमारी झाली. आता रोहीत पवारांच्या कंपनीवर छापेमारी करण्यात आली. ईडी सीबीआयने टाकलेल्या धाडीत 95 टक्के हे विरोधी पक्षातील लोक आहेत’ असे सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान शरद पवार बारामतीमधून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगल्या आहे. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी का माझा तिकीट कापण्याचा प्रयत्न करत आहात? अशी मिश्किल टिप्पणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. ”बारामती माझं कुटुंब आहे. 15 वर्षांपासून मी या मतदारसंघाची खासदार आहे. बारामतीच्या जनतेने विश्वास टाकल्यामुळे मी कायम त्यांची ऋणी राहिल. मात्र तुम्ही माझं तिकीट कापण्याचा प्रयत्न का करत आहात, अशी प्रतिक्रीया सुप्रिया सुळे यांनी दिली.