दुसऱया दिवसाचा अर्धा खेळ पावसाच्या पाण्यात

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तिसऱया कसोटी क्रिकेट सामन्यातील दुसऱया दिवशी जवळपास अर्धा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. पाकिस्तानच्या 313 धावसंख्येला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाने 47 षटकांत 2 बाद 116 धावसंख्येपर्यंत मजल मारली असून ते अजूनही 197 धावांनी पिछाडीवर आहेत. दोन वेळा पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही. खेळ थांबला मार्नस लाबुशेन 23, तर तेव्हा स्टिव्हन स्मिथ 6 धावांवर खेळत होते. सिडनीतील या कसोटी सामन्याच्या दुसऱया दिवशी मुसळधार पाऊस पडला. आधी काळय़ाकुट्ट ढगाळ हवामानामुळे मैदानावर अंधार होता. त्यानंतर जोरदार पावसामुळे खेळ थांबवावा लागला. पाऊस थांबल्यानंतर पुन्हा एकदा खेळाला सुरुवात झाली, पण काही क्षणात पुन्हा पाऊस आला अन् मग पुढे खेळ होऊ शकला नाही.