हिजबुल मुजाहिद्दीनचा मोस्ट वाँटेड कमांडर जावेद अहमद मट्टू याला दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. जावेद अहमद मट्टू याने जम्मू कश्मीर खोऱ्यात अनेक दहशतवादी कारवाया केल्या होत्या. त्याच्यावर दहा लाखांचे इनामही ठेवण्यात आले होते.