मी सकाळी 6 वाजता उठतो. सकाळी उठल्यावर करणार काय? अधिकाऱयांची झोप खराब करायची? 6 वाजता काम सुरू होत नाहीत. तुम्हाला झोप लागत नाही, ही आमची चूक आहे का? कुठल्याही अधिकाऱयाला अजित पवारांचे 6 वाजताचे बोलावणे आवडायचे नाही. मग तुमचे आऊटपुट काय? प्रत्येक विभागात हस्तक्षेप करणे; अधिकाऱयांच्या बैठका घेऊन मंत्र्यांना अस्वस्थ करणे हे तुम्ही केले नाही का? तुम्ही सुनील केदार यांना त्रास दिला नाही का? असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय शिबिराचे उद्घाटन अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते.