पोलिसांची मोफत फंगल इन्फेक्शन तपासणी 

वाकोला पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱयांसाठी फंगल इन्फेक्शन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. देबब्रत ऑरो फाऊंडेशन (DAF) सामाजिक संस्था आणि द एस्थेटिक क्लिनिक्सच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर राबविण्यात आले. या वेळी 27 पोलिसांनी मोफत तपासणी करून घेतली. पोलिसांसाठी मोफत शिबीर घेतल्याबद्दल वाकोला पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांकडून आभार व्यक्त करण्यात आले.