अर्शिन कुलकर्णीच्या तडाखेबंद 91 आणि त्याने आदर्श सिंग आणि अरावली अवानिशबरोबर केलेल्या दोन दमदार भागींच्या जोरावर हिंदुस्थानच्या 19 वर्षाखालील संघाने तिरंगी स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट आणि 55 चेंडू राखून सहज विजय मिळविला.सौमी पांडे आणि आराध्य शुक्ला यांच्या भन्नाट गोलंदाजीच्या बळावर हिंदुस्थानने दक्षिण आफ्रिकेचा डाव 240 धावांवरच संपुष्टात आणला. त्यानंतर 241 धावांचा पाठलाग करताना आदर्श सिंग आणि अर्शिन कुलकर्णीने 117 धावांची सलामी देत हिंदुस्थानचा विजय निश्चित केला. आदर्शने 66 धावा फटकावल्या. त्यानंतर अरावली अवानिशबरोबर 79 धावांची भाग रचत विजय संघाच्या आवाक्यातून आणून ठेवला. अवानिशने 56 चेंडूंत 60 धावांची नाबाद खेळी करताना संघाच्या विजयावर 41 व्या षटकांतच शिक्कामोर्तब केले.