उद्या अर्ध्या मुंबईत पाणीकपात

पालिकेच्या पवई वेन्चुरी येथील अप्पर वैतरणा आणि वैतरणा यामधील 900 मिमी व्यासाच्या जलवाहिनी जोडणीमध्ये गळती सुरू झाली आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम 4 आणि 5 जानेवारीला होणार आहे. त्यामुळे अर्ध्या मुंबईत 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. याचा फटका ए, सी, डी, ई, जी उत्तर आणि दक्षिण, एच-पूर्व आणि पश्चिम या विभागांना बसणार आहे. एल विभागात 24 तासांकरिता पाणीपुरवठा बंद राहील तर एस विभागात 4 जानेवारीला दुपारी 12 ते दुपारी 4 वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्ण बंद राहील.