चार देशांच्या हॉकी स्पर्धेत हिंदुस्थान खेळणार

दक्षिण आफ्रिकेमध्ये 14 जानेवारीपासून रंगणाऱया चार देशांच्या हॉकी स्पर्धेमध्ये हिंदुस्थानी संघ सहभागी होणार असून या स्पर्धेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. आफ्रिकेमध्ये होणारी ही स्पर्धा प्रो लीग आणि पॅरिस ऑलिम्पिकच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची ठरणार आहे.

आफ्रिकेमध्ये सुरू होणाऱया या हॉकी स्पर्धेमध्ये हिंदुस्थानचा सामना यजमान आफ्रिकेसह फ्रान्स आणि नेदरलॅण्ड्सबरोबर होणार आहे. या स्पर्धेपूर्वी 39 सदस्यांचा मुख्य गट राष्ट्रीय कोचिंग कॅम्पमध्ये भाग घेणार असून बुधवारपासून बंगळुरू येथील स्पोर्ट्स ऍथॉरिटी ऑफ इंडिया येथे कॅम्प सुरू होणार आहे.

11 दिवसांच्या शिबिरानंतर हिंदुस्थानी संघ केपटाऊनला रवाना होणार आहे. आफ्रिकेमध्ये 28 जानेवारीपर्यंत चालणाऱया या स्पर्धेच्या माध्यमातून हिंदुस्थानला फेब्रुवारी महिन्यात ओडिशा येथे होणाऱया प्रो-लीग स्पर्धेची तयारी करता येणार आहे. या प्रो-लीगमध्ये हिंदुस्थानला ऑस्ट्रेलिया, नेदरलॅण्ड्स, स्पेन आणि आयर्लंडचा सामना करावा लागणार आहे.

हिंदुस्थानचे खेळाडू सुट्टीनंतर ताजेतवाने होऊन संघात परतत असून हॉकीच्या हंगामाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयाने करणार आहेत. त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकपर्यंतचे संघाचे वेळापत्रक खूप व्यस्त असणार आहे, असे हिंदुस्थानच्या हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी सांगितले.

मुख्य गटासाठी निवडलेले खेळाडू

गोलरक्षक ः कृष्ण बहादूर पाठक, श्रीजेश पीआर, सूरज कारकेरा, पवन, प्रशांत कुमार चौहान. बचावपटू ः जर्मनप्रीत सिंग, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार, अमित रोहिदास, गुरिंदर सिंग, जुगराज सिंग, मनदीप मोर, नीलम संजीप जेस, संजय, यशदीप सिवाच, दीपसन तिर्की, मनजीत.

मिडफिल्डर ः मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, मोइरंगथेम रबिचंद्र सिंग, समशेर सिंग, नीलकंठ शर्मा, राजकुमार पाल, सुमित, आकाशदीप सिंग, गुरजंत सिंग, मोहम्मद राहिल मौसीन, मनिंदर सिंह. फॉरवर्ड ः एस. कार्ती, मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, अभिषेक, दिलप्रीत सिंग, सुखजीत सिंग, सिमरनजीत सिंग, शिलानंद लाक्रा, पवन राजभर.