उत्तर हिंदुस्थानात थंडीचा कडाका वाढणार; महाराष्ट्रात ढगाळ वातावरणाची शक्यता

उत्तरेकडील पर्वतीय भागात हिमवृष्टीला सुरुवात झाल्याने उत्तर हिंदुस्थानात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही भागात थंडीची लाट असून किमान तापमान आठ अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. येत्या काही दिवसात रात्रीच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असून उत्तरेकडील राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उत्तर भारतात थंडी आणि दक्षिण भागात पावसाचे सावट असून आता थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पुढील तीन दिवस देशाच्या उत्तर-पश्चिम आणि पूर्व भागात दाट धुके राहण्याचा देखील अंदाज वर्तवला आहे. उत्तर हिंदुस्थानात थंडी असताना आता थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्ये पाऱ्यात वेगाने घसरण होत आहे. पंजाब आणि हरियाणातील किमान तापमान सर्वाधिक वेगाने कमी होत असून मंगळवारी पंजाब या राज्यात सर्वाधिक कमी म्हणजे सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. आता मध्य हिंदुस्थानात जानेवारीत थंडी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हवामानात बदल झाल्याने मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे विदर्भ मराठावाडा आणि इत्तर महाराष्ट्रातही थंडी वाढणार आहे. दिवसा आणि रात्री आणि पहाटे थंड वातावरण आणि दिवसा ढगाळ वातावरणामुळे जनतेला उकाडा सहन करावा लागत आहे. मात्र, आठवड्याभरानंतर महाराष्ट्रात थंडी वाढण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.